नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
दिनांक ११ मे २०११ रोजी २० :४६ वाजता मी माझ्या आयुष्यातली पहिली कथा लिहून पूर्ण केली होती. कथेला नेहेमी प्रमाणे नायक होता..... नायिका पण होती. ती कथा माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये देत आहे. आज रोजी दुसरा अंक म्हणण्यापेक्षा दुसरी कथाच म्हणूया, लिहित आहे. ही वाचून झाल्यावर ती आधीची पण वाचा आणि मला कळवा कशी वाटली ते........... तो पर्यंत मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत रहा.
साधारण पणे दुपारची वेळ........ चार साडेचार ची. उतरतं उन आणि झोंबणारा गरम वारा......आज "तो" ला ऑफिस ला जायचा मूड नव्हता. तो आपला उगाचच फॉर्मल कपड्यांमध्ये इतस्ततः भटकत होता. नेहेमीच्या सातच्या कात्कैन्पासून दूर जात होता अर्थात त्त्यांच्यापासून पळत होता......... एका आवाजाच्या शोधात..... तो कोणाचा आवाज होता? "तो" च्या आंतर्मनाचा कि आणखी कोणाचा ते काही कळायला मार्ग नव्हता. पण शोध मोहीम जोरात चालली होती...... कुठेतरी चाललेली भावनिक घुसमट, स्पर्धेचं ओझं....... (इथे जगण्याची स्पर्धा आहे बरका) आणि शारीरिक दमछाक ह्या जाचातून बाहेर पडून त्याला एकांत हवा होता.... त्याच्या शोधात होता "तो".
एका दुकानाबाहेर सहज पणे उभा होता तो......तितक्यात कुठून तरी एका जुन्या पद्धतीच्या सायकलवर एका गोड मुलाला पुढे बसवून एक आदमासे ६४-६५ वर्षांचे आजोबा त्या दुकानात आले.....त्यांचे नाव देशमुख होते हे मला त्या दुकानदाराने सांगितले. त्यांनी एक मस्त जीन्स आणि टी-शर्ट घातला होता..... स्वच्छ आणि कडक इस्त्री केलेला......... आणि तो मुलगा ज्याचा नाव "अनिकेत" होता असा नंतर मला कळलं ...... तो ४ वर्षांचा होता....... बोबडे बोल बोलत होता......
ते वस्तू घेऊन बाहेर आले..... त्यांची आणि माझी नजरा नजर झाली.... अगदी सहजपणे त्यांनी माझ्याकडे पाहून एक अनौपचारिक स्माईल दिली. आणि मला कळलेच नाही किई कुठून संवादाला सुरुवात झाली.
माझा चेहेरा पाहूनच त्यांनी सगळा ओळखलं. त्यांच्या वयात आता काही सांगायची गरज नसतेच, अनुभवाची शिदोरी इतकी मोठी असते की नुसत्या नजरेनेच सगळा ओळखता येत...... मला म्हणाले चाल जरा चालुयात.... ह्या रस्त्याने....... अनिकेतला पुढे बसवून एका हाताने सायकल लोटत आणि दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवून ते निघाले.... आम्ही चालायला लागलो......
"कधी कधी कहा नातं असावच लागतं असं नाही वाटत मला......... अशी सुरुवात केली आणि ते बोलत राहिले आणि तो ऐकत गेला......... फक्त ऐकत गेला............ कारण "तो" ची वाचा एक अज्ञात शक्तीने नियंत्रणात ठेवावी तशी बंद झालेली........
ते म्हणत होते,
"तुला थोडासा अवघड वाटत असेल न मी असं अचानक तुझ्यावर हक्क दाखवणं......आणि माझे अशे ती तिची.आधुनिक कपडे आणि जुनाट सायकल.......... हे कॉम्बिनेशनच मुळात खूप विचित्र वाटत असेल तुला.
मित्रा, मित्रा म्हणू न तुला मी? नाही आपल्या वयात अर्थात शारीरिक वयात कदाचित बरच अंतर असेल पण मानसिक किंबहुना बोद्धिक वयात फारसं अंतर नसेल...... कारण बुद्धीचं वय कधीच वाढत नाही......
असो. माझ्या पहिल्या कमाईतून मी ही सायकल घेतली होती १९६७-६८ च्या सुमारास. तेव्हा ३० पैसे किंमत होती तिची. अगदी साधी पण मजबूत आणि दणकट. पहिल्यांदा टांग टाकली आणि प्रेमातच पडलो तिच्या ते आजतागायत मी तिच्यावर आकंठ प्रेम करतो. माझ्या आयुष्यातली पहिली माझी सोबतीण आणि पाहिलं स्त्रीलिंगी व्यक्तिमत्त्व........ मला आई नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा हिच्यावर प्रेम जडलं.
माझे बाबा तेव्हा एका गिरणीत कामगार होते कनिष्ट श्रेणीतले. त्यामुळे सायकल घेण्याची चैन कधी केलीच नाही. मग कालांतराने शिक्षण, लग्न, नोकरी, आणि मग वयाच्या ३७ व्या वर्षी फक्त बायकोचा पाठींबा आणि खिशातले कसल्याश्या फंडाचे १४,००० रुपये यावर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. गाठीशी तब्बल १७ वर्षांचा नोकरीचा अनुभव. मग जोमात कामाला सुरुवात केली...... आणि एक प्रथितयश बिस्नेस्मन झालो. आज स्वतःचा बंगला, ४ गाड्या आणि स्वतःची आवड म्हणून घेतलेली एक मर्सिडीज बेंझ गाडी..... हाताशी नोकर चाकर.... परदेशात स्थायिक झालेली आणि आत्ता सुट्टीत भारतात आलेली दोन्ही अतिशय कर्तृत्ववान मुलं.. त्यांचं सगळं समाधानाने पाहून मागल्याच वर्षी आयुष्याच्या पटावरचा डाव अर्ध्यात टाकून मला सोडून गेलेली माझी सुलभा..... फक्त कुठल्याश्या तापाचा निमित्त झालं आणि गेली ती गेलीच.
हे सगळं सांगण्याचा उद्देश मोठेपणाची फुशारकी मारण्याचा नव्हता... काय मिळवायचं राहिलं का या आयुष्यात... सगळं मिळालं..... मान-सन्मान, सुख-दुःख, अगदी जीव तोडून जगलो हे आयुष्य. पण मी आज हे तुला का सांगू शकतोय माहितीये,
कारण मी प्रत्येक क्षण जगलोय अगदी १०० टक्के. जसा आला तसा, त्या क्षणाला आपला समजून जगलोय. मला जे करायचं होतं ते केलं.. मला अतिशय छोट्या गोष्टीत आनंद शोधायला आवडतो. माझी ही सायकल चालवणे, स्वतःचा स्वयंपाक करणे, पुस्तके वाचणे, बाग काम करणे आणि मी एका वृद्धाश्रमाचा कर्मचारी पण आहे. सगळ्यांना एकत्र जमवून जाम धमाल करतो मी. मला माहित आहे हा क्षण एकदा निसटला कि परत येणार नाही, कधी कुठल्या गाडीवर, गोळीवर, बॉम्बवर, रोगावर, आपला बुलावा लिहिला असेल. माहित नाही ना?..... मग आजचा हा आत्ताचा क्षण का वाया घालवता? जगा जीव तोडून जगा.... हसून, रडून, आनंदून, दुःखात बुडून किंवा तटस्थपणाने जगा, पण जगा, त्या क्षणाला पूर्ण न्याय द्या. तो फक्त आपला आहे या जगात बाकी काही नाही. सगळं काही आपल्या मनासारखं मिळत नसतं आपल्याला. पण ते मिळालंय ना मग नावडतं का असेना पण त्या क्षणाला त्या क्षणाचे नावडते पण जगा. नोकरी आवडत नाही.... मग बदल नसेल शक्य तर आवडते आहे असे समजून जगा.... तसं जमत नसेल तर थोडा वेळ द्या. आपण कायम आनंद मोठ्या गोष्टीत शोधायला जातो आणि दुःख छोट्या गोष्टीत. ह्याच्या पूर्णपणे उलटं जगून बघा बरं एकदा. बघा कसे दिवस पालटतील तुमचे...... जमेल मित्रा तुला. मला माझ्या व्यवसायाच्या पहिल्याच वर्षी ४५०००० चं नुकसान झालेलं. तरी मी त्यातून सावरलो. एक सूत्र मनात ठेव. हा क्षण आपला आहे. तो जगुयात अगदी शेवटचा असल्यासारखा. बघ तुला तुझ्या वयाच्या ६० वर्षी माझ्यासारखेच उत्तर देता येते का नाही ते.
आणि मुळात आपलं आयुष्य खूपच कमी असता. का ते दुःख मोजण्यात घालवायचं? जगुयात ना मस्त. आत्ता ह्याक्षणी कसं तू मन लावून माझं ऐकलंस आणि ह्या क्षणाचा विजय झाला. असाच मोठा हो मित्रा."
असे म्हणून त्यांनी "तो"च्या पाठीवर अशी काही जोरात थाप मारली आणि सायकलची टांग मारून क्षणार्धात नाहीसे झाले "तो"च्या पुढ्यातून..... "तो"ला असंच विचारात पडून......... आणि तो फक्त स्मित हस्त वादनाने त्यांच्या वाटेकडे पाहत राहीला.