जंगल.. अद्भुत अद्वितीय अनाकलनीय असामान्य अमानवी .... पराकोटीची शांतता... तिथे आवाज फक्त निसर्गाचा... पंच महाभूतांचा... जंगलाच्या राजाचा....
जंगल सफारी .... किंवा जंगलात जाणं हा मुळातच माझा छंद आहे असं मी म्हणू शकतो. कारण "रणथंभोर (मार्च २०१५)" आणि "ताडोबा (मार्च २०१६)" नंतर "कान्हा (डिसेंबर २०१६)" ही माझी तिसरी ट्रिप. आणि ह्याच तिसऱ्या ट्रिप नंतर मी माझ्या प्रवासाबद्दल काहीतरी लिहू शकेन हा आत्मविश्वास मला आता आला आहे.
"कान्हा"ला जायचं हे कधी पासूनच डोक्यात होतं कारण खूप ऐकलेलं आणि वाचलेलं होतं या जंगलाबद्दल. आपल्या "मोगली"चं हे जंगल... अतिशय घनदाट... हिरव्यागार वनराईने नटलेलं.. "कोअर झोन" आणि "बफर झोन" मिळून अदमासे २००० स्क्वेअर किलोमीटर्स चं हे जंगल मध्यप्रदेशातील "मंडला आणि बालाघाट" ह्या तालुक्यात वसलेलं.
माझा मित्र "श्रीपाद थेटे" याने नुकतीच "साउंड ऑफ वाइल्ड, पुणे" नावाची "वाइल्ड लाईफ टुरिझम" अर्थात "जंगल पर्यटन" हा मुख्य उद्देश्य असणारी कंपनी सुरु केली आहे. ह्या कंपनी तर्फे ०७ डिसेंबर २०१६ ते १२ डिसेंबर २०१६ असा कान्हा जंगलात जाण्याचा प्लॅन होताच ते ऐकताच मी उड्या मारत तयार झालो आणि ट्रीपच्या तयारीला लागलो.
आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण करून एकदाचे आम्ही पाच जणं आणि श्रीपाद असे ७ डिसेंबर २०१६ ला निघालो सायंकाळच्या "पुणे-नागपूर गरीबरथ" ने. मी, श्रीपाद, अर्चित कवीश्वर, हर्षल वाडेकर, प्राजक्ता शिंगवेकर आणि आदिती देशपांडे असे सहा जण होतो ह्या ट्रीपला.
८ डिसेंबर ला सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशन वर पोहोचलो. तर तेथे आम्ही पोहोचण्याच्या आधीच "लखन दादा" नावाचा आमचा चक्रधर आमची वाट पाहत उभा होता. मारुती सुझुकी अर्टिगा गाडीत आम्ही बसलो सामान बांधलं आणि निघाली आमची स्वारी कान्हा जंगला कडे. नागपूर ते कान्हा २५० किलोमीटर चे अंतर आहे. रस्ता तसा चांगला आहे पण मधला जवळ जवळ १०० किलोमीटर्स चा पट्टा अतिशय खराब आहे. नागपूर-कान्हा रस्त्यावर "पेंच" ह्या जंगलाचे महाराष्ट्रातील भाग तसेच मध्यप्रदेशातील भागही लागतात. कान्हाला, "मुंबई-जबलपूर-कान्हा" मार्गेही जाता येते.
आमचा परतीचा ११ डिसेंबरचा प्रवास होता, कान्हा-नागपूर अर्टिगाने आणि नागपूर-पुणे गरीबरथने.
१२ डिसेंबर ला सकाळी पुण्यात परत येणार होतो आम्ही.
आमची ८ तारखेला दुपारची एक, ९ तारखेला सकाळ-दुपार अश्या दोन, १० तारखेला सकाळ-दुपार-रात्र अश्या तीन, आणि ११ तारखेला सकाळची एक अश्या एकूण ७ जंगल सफारी होत्या. सकाळची सफारी ही पहाटे ६:३० ते ११:०० अशी असते तर दुपारची सफारी ३:०० ते ५:३० अशी असते आणि रात्रीची सफारी सायंकाळी ७:३० ते रात्री १०:०० अशी असते. कान्हा जंगलाच्या कोअर झोनचे १. सरई, २. किसली, ३. मुक्की आणि ४. कान्हा असे चार भाग पडतात. सकाळ आणि दुपारच्या सफारी ह्या चार भागातच असतात तर रात्रीची सफारी ही बफर झोन मध्ये असते. आम्ही कान्हा ला पोहोचल्या नंतर आमची राहण्याची आणि खाण्याची सोय "WINDSOR TIGER RESORT" मध्ये केलेली होती. अतिशय स्वच्छ अश्या डबल शेअरिंग एअर कंडिशन्ड रूम्स आधीच आमच्या स्वागतासाठी तयार होत्या. "संतोष दादा यादव" हे आमचे ह्या हॉटेलचे मॅनेजर होते. आणि "विजय दादा" नावाचा आमची केअर टेकर होता. जंगल सफारी ही सुझुकी कंपनीच्या उघड्या जिप्सी मधून करावी लागते. तर आम्हाला हॉटेल तर्फे एक जिप्सी आरक्षित होती आणि त्याचा चक्रधर हा "रितेश दादा" होता.
राहण्या खाण्याची उत्तम सोय, अंघोळीला आणि प्यायला हवा तेव्हा गरम पाणी. कान्हा मध्ये थंडी खूप असते त्यामुळे गरजेप्रमाणे ब्लँकेट्स ची पण सोय. खायला हवं ते बनवून देणार, दोन वेळेचा चहा, नाश्ता आणि जेवण अशी साग्रसंगीत व्यवस्था होती. साउंड ऑफ वाइल्ड आणि WINDSOR TIGER RESORT ह्यांनी आमची अतिशय उत्तम बडदास्त ठेवली होती. त्याबाबद्दल मी श्रीपाद आणि संतोष दादा ह्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
जंगलाचे स्वतःचे असे काही नियम आहेत. तिथला राजा हा वाघच. माणूस हा तिथे उपराच. जंगलात खूप आवाज करून चालत नाही, "रंगीबेरंगी, झगामगा मला बघा" असे कपडे घालून चालत नाही, shampoo किंवा साबण किंवा डिओड्रंट आणि perfume यांचे अनैसर्गिक वास प्राण्यांना चालत नाहीत, प्लास्टिक किंवा कसलाही मानवनिर्मित कचरा केलेला चालत नाही. ह्या बाबतीत मध्यप्रदेश सरकार खूप जास्त कडक आणि particular आहे. आणि ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. रणथंभोर हे कमालीचे व्यावसायिक जंगल आहे आणि ताडोबा हे खूप अव्यवस्थित जंगल आहे, अजिबात शिस्त नसलेलं. त्यामानाने कान्हा हे खूप जास्त वेल managed जंगल आहे. तिथे जिप्सीचा स्पीड हा २० किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त नसतो आणि हा नियम तिथले सगळे चक्रधर पाळतात. प्रत्येक जिप्सी सोबत तिथल्या वन्य विभागाचा एक गाईड असतो. तो दर सफारीला नवीन असतो.
जंगल तुम्हाला खूप शिकवतं, ती शांतता, ते आवाज, वाघ दिसण्याची वाट बघत एका जागी थांबणं अगदी काहीही ना करता (मोबाइल स्वीच ऑफ करावे लागतात किंबहुना केलेले चांगले), ते वाघाच्या हालचाली बरहुकूम इतर प्राण्यांनी दिलेले कॉल्स, विशेषतः हरीण आणि माकड.
दिवसा इतकी किर्र झाडी असते की रात्रीचं जंगल किती भयानक असेल, खरंच रात्रीच्या सफारीचा अनुभव कमाल थरारक होता, फक्त जिप्सीच्या हेड लाईटचा तेवढा प्रकाश, बाकी किर्र अंधार, ती भयानक शांतता, रातकिड्यांचा आवाज पिन ड्रॉप सायलेन्स सगळीकडे.... त्यात आम्हाला ससा दिसला, जंगली ससा आणि इंडियन Gaur चं संपूर्ण कुटुंब दिसलं.
दिवसा सफारीला आम्हाला अतिशय दुर्मिळ असा Barasingha, Sambar Deer, Barking Deer, Spotted Deer, Jackal, Indian Gaur असे अनेक प्राणी दिसले, अनेक पक्षी पण दिसले.
असं म्हणतात की आपल्याला जरी वाघ दिसला नाही तरी वाघाने आपल्याला पाहिलेलं असतं.
वाघ हा त्याच्या मर्जीचा मालक आहे, राजा आहे तो, त्याला हवं तेच करणार. आणि त्याला हवं तेव्हाच दिसणार`. अनेकदा आम्हाला अगदी ताज्या पाऊलखुणा दिसायच्या पण वाघ दिसायचा नाही. ७ सफारी पैकी ६ सफारीत आम्हाला एकदाही वाघ दिसला नाही पण शेवटच्या सफारीत आम्हाला एक वाघ दिसला बजरंग नावाचा (हे नाव नंतर कळलं) तो आणि त्याची live in Relationship पार्टनर असे दोघे आपल्या ईश्वरदत्त कर्तव्यासाठी चालले होते. हा वाघ पण इतका लांबून आणि ओझरता दिसला की त्याचे फोटोज काढता नाही आले पण that is the beauty of the जंगल. कान्हामध्ये मुन्ना, भीमा (नुकताच वारला), किंगफिशर (नुकताच वारला), छोटा मुन्ना, बजरंग, आतंकवादी ह्या आणि अश्या अगणित नावांचे वाघ आहेत आणि जंगलावर राज्य करत आहेत.
प्रत्येक जंगल सफारी ही पुढच्या सफारीचे मोटिव्हेशन देते, आता पुढील पायरी ही बांधवगडाची. तुम्हाला हे वाचून जंगलात जावेसे वाटल्यास नक्की जा आणि साऊंड ऑफ वाइल्ड नक्कीच तुम्हाला यात मदत करू शकेल. पण आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी जंगल अनुभवावेच.
शांतता.... शांतता... अंगावर येणारी शांतता.....
Image Courtesy: Wikipedia and Mr. Shripad Thete.
Thank you @SoundOfWildPune.
-ईशान कुलकर्णी