नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
कवितेच्या रुपातलं हे माझं १२ व रत्न. मनावर सगळ्यात जास्त राज्य करतात त्या आठवणी मग त्या चांगल्या असोत वा वाईट. त्या आठवणी आणि त्यांच्याशी निगडीत भावनांवर लिहिलेली ही कविता
जरा जड जाऊ शकते समजायला पण नीट वाचली तर नक्की कळेल आणि पटेलही. बघा कळतिये का आणि कळल्यावर पटतिये का?
मला नक्की कळ्वा तुमचा अभिप्राय आणि तो पर्यंत मजा करा काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.
एकट्या तृषार्त मनाला,
सहवासाची तहान लागते
आठवणींच्या मृगजळाला ते
पाणी समजू लागते!!
कितीही मागे पळाले तरी
ते मात्र दूरच पळते,
कितीही पकडायचे म्हटले
तरी आपले बळ कमीच पडते!!
कालांतराने मात्र मृगजळाचे चक्रव्यूह होते
अधिकच गुंतून पडल्याने
मन अभीमन्युसारखे वागते!!!
बाहेर पडण्याच्या व्यर्थ झटापटीत
अधिकच गुंतून पडते
जणू स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात
स्वतःच रुतून बसते!!
त्या जाळ्याशी झगडत असताना
एक मात्र सपशेल विसरते
कि प्रत्यक्षात ते जाळे मात्र
दुसऱ्यानेच विणलेले असते!!
झगडता झगडता जाळे विणण्यात निष्णात
अश्या कोळ्याचे किटकात रुपांतर होते
आणि कोठूनच वाट सापडत नाही म्हणून
आहे तिथेच फतकल मारून बसते
पण एक मात्र नक्कीच असते
आयुष्य मात्र आठवणीन्च्याच रुपात मनावर ठसते
चांगल्या असो व वाईट
मन त्यांचेच रवंथ करत बसते
आठवणींचे प्रत्येक जाळे
एक अनुभव होऊन बसते
चांगले ते पटकन विसरून
वाईट तेवढं दीर्घकाळ स्मरणात राहते
तरी मन पुन्हा पुन्हा आठवते
कारण प्रत्येक आठवण
एकतर आशीर्वाद ठरते
नाहीतर आयुष्यभर आठवेल असा धडा बनते!!!
No comments:
Post a Comment