कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
लहानपणी सारंच निराळं असतं
शाळा हेच आपलं जग असतं
वाटावाटी करून खाणं आद्य कर्तव्य असतं
मनात एक आणि तोंडात दुसरं असं काही नसतं
निरागसता हे मैत्रीचं पाहिलं वैशिष्ट्य असतं
शिक्षा आणि गाभुळलेल्या चिंचांचे झाड एकत्रच उपभोगलेलं असतं!!!
तरीपण.......
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
शाळेनंतर कॉलेज एक अद्भूत जग असतं
नाविन्याची कास धरून नवतारुण्य अवतरलेलं असतं
नवीन भावना आणि नवीन ओळखी यांचं वेगळंच नातं असतं
नवीन विश्व फारच मजेशीर आणि आकर्षक असतं
नाविन्याच्या ओघात जुनं ते मागे पडलेलं असतं
जुनं तेच सोनं असते आणि नवीन ते मृगजळ असते हे काही कळालेलं नसतं
मैत्रीचं अद्भुतरम्य जग घरच्यांपेक्षाही जवळचं बनलेलं असतं
तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
शिक्षण संपल्यानंतर निराळच वाढून ठेवलेलं असतं
करियर नावाचं जोखड मानेवर लादलेलं असतं
स्वतःचं तेवढं पहावं इतकं संकुचित ते जग असतं
नाविन्यातले सगळं अधिकच दूर गेलेलं भासतं
जुने ते मागेच सरलेलं असतं
सोबतीची खरी गरज आहे हे खूप उशीरा कळतं
इगो नावाच्या विकाराने मन अधिकच ग्रासतं!!!
तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
आपल्यासाठी फार थोड्या जणांचं हृदय जळत असतं
जनरेशनच्या फरकामुळे आधीच त्यांना मागे टाकलेलं असतं
आपलं मन मात्र त्यांना सोडून भलत्याच्याच पाठीमागे भरकटत असतं
आपल्याला फक्त ह्याचंच वाईट वाटत असतं
की आपल्यावाचून त्यांचं काहीच अडत नसतं
तरी त्यांच्यासाठी मन मात्र तीळ तीळ तुटत असतं
ह्यातूनच खोलवर मन निराशेच्या गर्तेत रुतत असतं
It's all about priorities असं म्हणणं सोपं असतं!!!!
तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहित नसतं
ज्यांना माहित असतं त्यांचा आपल्याला ऐकायचं नसतं
आपल्याला आपलंच दुःख कुरवाळत बसायचं असतं
तरीपण........
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
पण शेवटी ह्या सगळ्याच्या पलीकडे पोहोचतो आपण
कारण लक्षात राहते ती फक्त आठवण
नक्की भेटायचे वायदे करतो जोपण
दरवेळी पुढे करतो कारण
ती वेळ काही कधी येताच नाही
कारण
जगात शाश्वत सत्य फक्त एकच असतं
कोणाचं कोणावाचून काही अडत नसतं!!!!
No comments:
Post a Comment